घुंगरुंची छमछम आणी पैशांची उधळण सोलापुरात पोलिसांनी रोखली 

सोलापूर : सोलापूर पोलिस आयुक्तांच्या विशेष भरारी पथकाने सोलापूर येथील सोरेगाव नजीक ऑर्केस्ट्रा बारवर शनीवारी भल्या पहाटे धाड टाकली.  गुलमोहर ऑर्केस्ट्रा बार येथे टाकण्यात आलेल्या धाडीत तोकड्या कपड्यातील 13 नृत्यांगणा संगीताच्या तालावर थिरकतांना आढळून आल्या. या नृत्यांगणांवर 43 ग्राहक नोटा उडवत होते. या ऑर्केस्ट्रा बारचे मुख्य चालक तानाजी देवराव लकडे, आकाश चंद्रकांत जाधव यांच्यासह एकूण 49 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  या कारवाईत 7 मोटरसायकली, 8 चार चाकी वाहने, साऊंड सिस्टिम, अन्य साहित्य तसेच रोख 2 लाख 71 हजार 880 रुपये असा एकुण 59 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हाँटेल चालक तानाजी देवराव लकडे, आकाश चंद्रकांत जाधव, शिवानंद मसळीकर (वेटर), देविदास दगडू गायकवाड (वेटर), गणेश दगडू गायकवाड (वेटर), अभिषेक मनोज दणाणे (वेटर), मल्लिकार्जुन मरुळ, इरण्णा पुजारी, बरकतअली कुरेशी, अमर कोंजारी, अमितकुमार मोटे, सिकंदर धोत्रे, मिराज कुरेशी, गौस अब्दुल टक्कळकी, आकाश हजारे, रवी निकम, प्रसाद आळंद, ताज उमराणी, रियाज पठाण, सैफअली बागवान, इब्राहिम पटेल, मो. इरफान पटेल, नदीम पेंडारी, अरीफ कलेगार, शिरीश गायकवाड, आकाश पठारे, रोहन गंगणे, मोहंमद तौषिक तेनाली, निसार अहमद सातबच्चे, संतोष रेड्डी, गौस पटेल, महेश ठाकूर, जब्बार बागवान, अख्तार हुसेन दर्जी, अरबाज शेख, माणिक रेड्डी, अमितकुमार समदळ, महंमद जाहिद दंडू, अनिकेत गोरट्याल, इब्राहिम शेख, सैफन इरकल, सलीम तिलगर, गणपती पुजारी, पांडुरंग शामल, सागर गायकवाड, विनोद सूर्यवंशी, रितेश मारगम, यश सारंगी, समीर शेख या ग्राहकांविरुद्ध अश्लील नृत्यास प्रतिबंध आणि महिलांची प्रतिष्ठा संरक्षण कायदा 2016 चे कलम 3, 8, (1), (2), (4) नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here