रंगपंचमी खेळणा-या जमावाच्या मारहाणीत खाटीक जखमी

जळगाव : रंगपंचमी खेळणा-या जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. जळगाव शहरातील मेहरुण भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी 10 ते 12 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिम अब्दुल रहीम खाटीक (44) रा.मास्टर कॉलनी जळगाव असे जखमी खाटीकचे नाव आहे.
काशिम अब्दुल रहीम खाटीक हे आपल्या मोटार सायकलने मेहरुण परिसरातून 18 मार्च रोजी सायंकाळी पावणे सात वाजता जात होते. रस्त्यात महादेव मंदीराच्या पुढे वाजंत्री लावून काही मुले रंगपंचमी खेळत होते. या गर्दीत खाटीक यांच्या समोरुन येणारा वृद्ध आणि मुलाला मोटार सायकलचा धक्का लागला. या धक्क्याने दोघे खाली पडले. दोघांना उचलण्यासाठी खाटीक मोटार सायकलवरुन खाली उतरले असता जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. वृद्धाने लाकडी दांड्याने खाटीक यांच्या दोन्ही हातांच्या कमानीवर मारहाण केल्याने ते खाली पडले.

या संधीचा फायदा घेत जमलेल्या जमावाने खाटीक यांना पब्लिक मार देण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत खाटीक यांचे तिन दात पडले आहेत. जमावाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अंकुश कोल्हे नामक वृद्धासह रंगपंचमी खेळणा-या अनोळखी 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती अंकुश पुना कोल्हे (66) रा. विठ्ठल मंदीर चौक मेहरुन जळगाव, भरत विकास नेमाडे (23) रा. महाजनवाडा मेहरुण जळगाव, सागर अंकुश कोल्हे (31) रा. विठ्ठल मंदीर चौक जळगाव, विकास पुंडलीक नेमाडे (52) रा. महाजनवाडा मेहरुण जळगाव, पुरुषोत्तम मांगो चिमणकर (30) रा. पिंप्राळा हुडको जळगाव, अतुल मांगो चिमणकर (29) रा. पिंप्राळा हुडको जळगाव आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here