चिमुकलीची हत्या करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला : अवघ्या तेरा महिने वय असलेल्या चिमुकलीचा जन्मदात्या आईने गळा दाबून हत्या केल्याची घटना अकोला एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील बाभुळगाव हद्दीत उघडकीस आली आहे. या घटनेनंतर चिमुकलीच्या आईने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  सोमवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

प्रियंका उमेश बोबडे असे या घटनेतील महिलेचे नाव असून तिने घरातील शौचालयाचा दरवाजा आतून बंद करत आपल्या तेरा वर्षाच्या मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. घरातील सदस्यांच्या हा प्रकार लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरगुती वादातून संतापाच्या भरात हा प्रकार तिने केल्याचे समजते. तिची प्रकृती गंभीर असून तिच्या पतीने याप्रकरणी गुन्हा दाखल  केला आहे.  पोलिस निरीक्षक किशोर वानखेडे पुढील  तपास करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here