ट्रकच्या चाकाखाली आल्याने बालक ठार

जळगाव : जळगाव शहरापासून जवळच असलेल्या लांडोरखोरी उद्यानानजीक ट्रकच्या चाकाखाली आलेला शाळकरी विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक करण्यात आली. सुजय गणेश सोनवणे असे अपघाती निधन झालेल्या बालकाचे नाव आहे.

चौथीच्या वर्गात सेंट टेरेसा शाळेत शिकणारा सुजय गणेश सोनवणे हा राजु गवळी यांच्या मोटार सायकलवर (एमएच 19 डीएम 111) डबलसीट बसून जात होता. दरम्यान पलीकडून आरटीओ ट्रॅकवरुन येणा-या ट्र्कच्या (एमएच 28 बी 7703) धडकेत सुजय चाकाखाली आला. या घटनेत सुजय जागीच मृत्युमुखी पडला. घटनेनंतर भयग्रस्त ट्रकचालकाने लागलीच पलायन केले.  मयत सुजय  यास तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांतता प्रस्थापित केली.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here