दहा लाख रुपयात फसवणूक – बिहारच्या तिघांना अटक

यवतमाळ : ट्रेडींग अकाऊंट उघडण्याच्या बहाण्याने हार्डवेअर व्यापा-याची दहा लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघा आरोपींना अवधूतवाडी पोलिसांच्या पथकाने बिहार राज्यातून अटक केली आहे. जमील अख्तर शाकीन रंगापोखर (रा. निमौल), उपदेश शर्मा शाकीन (रा. बुधौलमनी) आणि यासीर अरफत शाकीन शेखपुरा (रा. निस्ता) अशी अटकेतील तिघा संशयीतांची नावे आहेत. तिघांना न्यायालयाने 28 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत.

असद जफर बॉंम्बेवाला या हार्डवेअर व्यावसायीकाची ट्रेडींग खाते सुरु करण्याचे आमिष दाखवत दहा लाख रुपयात फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती आरोपी हे बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी बिहार राज्यातील आजमनगर येथून तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून फसवणूकीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. धिरेंद्रसिंग बिलवाल, सुरेश मेश्राम आदी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here