बिड शहरात तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून विवाहितेची हत्या

बीड : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून विवाहितेची हत्या केल्याच्या आरोपाखाली तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी बिड शहरातील शाहू नगर भागातील या घटनेने खळबळ माजली आहे. यास्मिन शकुर शेख (21) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह दीर व जाऊ अशा तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिस्त्रीकाम करणारा विवाहितेचा पती शकुर बशिर शेख यास अटक करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर विवाहितेचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनकामी आणण्यात आले. अगोदर गुन्हा दाखल करा त्यानंतर अंत्यसंस्कार करु अशी शोकसंतप्त भुमिका नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तणावपुर्ण झाले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here