25 लाख रुपये ट्रकचालकाकडून धुळ्यात जप्त

धुळे : रात्रगस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात ट्रकचालकाच्या ताब्यातील सुमारे 25 लाख रुपयांची रोख रक्कम धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदर रक्कम मालेगावच्या व्यावसायीकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर रक्कम ट्रकचालकाच्या माध्यमातून सुरत येथे नेली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या रकमेबाबत अधिक तपासकामी धुळे तालुका पोलिसांनी आयकर विभागाला कळवले आहे.

धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि.हेमंत पाटील रात्र गस्तीवर असतांना सुरतकडे जाणा-या ट्रकचालकाकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती त्यांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुसुंबा शिवारात तपासणी मोहीम राबवण्यात आली. एमएच 17 एजी 0592 या संशयीत ट्रकची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्र्कचालक शेख शफिक शेख अहमद (57) गल्ली क्रमांक 4 गुलशेरनगर, मालेगाव याच्या सीटच्या मागे ठेवलेल्या पिशवीत रोकड आढळून आली. सदर रोख रक्कम विजयभाई बाबूभाई पटेल (रा. मालेगाव) यांची असल्याचे चालकाने सांगितले. सुरत येथे ते स्पेअरपार्ट खरेदी करण्याकामी येणार असल्याचे देखील चालकाने सांगितले. सदर रक्कम ताब्यात घेतल्यानंतर आयकर विभाला कळवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी प्रवीण पाटील, प्रमोद ईशी, नंदू चव्हाण, प्रकाश भावसार, कुणाल शिंगाणे, राकेश मोरे, कांतिलाल शिरसाठ, रवींद्र राजपूत, नीलेश पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here