पोलीसांच्या ताब्यातुन पलायन करणारा एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : धुळे ते भुसावळ प्रवासादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातील आरोपीने संधी साधून पलायन केल्याची घटना घडली होती. राजू विक्रम कांडेलकर असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन करणा-या राजू कांडेलकर यास आज एलसीबी पथकाने शिताफीने अटक केली आहे.

भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी राजू कांडेलकर (20) रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर यास धुळे उप कारागृहातून जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला धुळे येथून भुसावळला आणत असतांना पाळधी नजीक जैन फॅक्ट्रीजवळ पोलिस वाहन हळू झाले. वाहन हळू झाल्याचा गैरफायदा घेत त्याने वाहनाचा मागचा दरवाजा उघडून पोलिसांची नजर चुकवत उडी मारत पलायन केले होते. या पलायन प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि.224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार झालेला राजु कांडेलकर हा रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे लपून बसला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ. दिपक शांताराम पाटील, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, चालक पोलिस नाईक अशोक युवराज पाटील आदींनी त्याला तांदलवाडी येथे जावून शिताफीने अटक केली. त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात तपासकामी देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here