शरीरसुखाच्या लालसेने नरेश फेडायला गेला साडी– चाकूच्या घावात आकाशने दाखवली मृत्यूची खाडी!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : राजकुमारी (काल्पनिक नाव) रहात असलेल्या घराजवळच नरेश आनंदा सोनवणे हा तरुण देखील रहात होता. जळगाव शहरातील शिवशक्ती नगरात बहिणीकडे राहणारा अविवाहीत नरेश हा रिक्षाचालक होता. त्याच परिसरात राजकुमारी देखील आपल्या आई व भावासोबत रहात होती. तारुण्याच्या सर्वोच्च शिखरावर असलेली राजकुमारी फुल फॉर्मात होती. तारुण्याचे शिखर तिने सरसर चढून सर केले होते. तिची आणि नरेशची दररोज नजरानजर होत असे. नजरेच्या खेळात राजकुमारीला घायाळ करण्यात नरेश कधीही कमी पडत नव्हता. राजेश खन्नाच्या फिल्मी स्टाईल अदाकारीप्रमाणे नरेश तिच्या दिशेने आपल्या नजरेचा बाण मारत असे. नजरेच्या बाणात राजकुमारीच्या काळजाचे जणू पाणी पाणी होत असे. दोघांच्या नजरेचा कसुर असतांना प्रेमाची सुरी एकमेकांच्या हृदयाला घायाळ करत असे.

अविवाहीत नरेश रिक्षाचालक होता. नरेशच्या रिक्षाचा आवाज आला म्हणजे राजकुमारी पटकन घराबाहेर येऊन त्याला हात दाखवून टाटा, बाय – बाय आणि वेलकम करत असे. ती त्याला आपल्या प्रेमाच्या नजरेत सामावून घेत होती. अशा प्रकारे दोघांच्या प्रेमाचा सिलसिला सुरु होता. सन 2011 – 2012 चा तो काळ होता. दोघांचे प्रेम उफाळून आले होते. दोघांचा नजरेचा खेळ बराच पुढे सरकला आणि बदलला होता. बघता बघता त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण होण्यास वेळ लागला नाही. चोरी चोरी आणि चुपके चुपके दोघे प्रेमवीर शरीर संबंधाचा आनंद लुटू लागले. लग्नानंतरची कृती राजकुमारीने लग्नापुर्वीच अ‍ॅडव्हान्स रुपात नरेशकडून आत्मसात करुन घेतली होती. राजकुमारीच्या वागण्यात काहीतरी बदल होत असल्याचे एव्हाना तिच्या आईच्या लक्षात आले. तारुण्यात आलेली आपली मुलगी हाताबाहेर जाण्यापुर्वीच तिचे लग्न लावून दिले पाहिजे असा सारासार व्यावहारीक विचार तिच्या आईने मनाशी पक्का केला. राजकुमारीला पतीरुपी कुंपनात आणि बंधनात घालून दिले म्हणजे तिच्या संसाराची गाडी रुळावर येईल आणि आपण देखील आपल्या एका सांसारिक जबाबदारीतून मुक्त होवू असा राजकुमारीच्या आईने केलेला विचार योग्य होता. त्यामुळे तिच्या आईने जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने राजकुमारीसाठी वायुवेगाने वर संशोधन सुरु केले. त्यात तिला यश आले.

भुसावळ तालुक्यातील एका तरुणासोबत राजकुमारीचे लग्न निश्चित करण्यात आले. लग्नाची तारीख निश्चित झाल्याने आता राजकुमारी विवाहिता होणार होती. तिच्या लग्नाच्या दिवसापर्यंत आणि तिच्या डोक्यावर अक्षदा पडेपर्यंत नरेश तिच्यावर प्रेम करत होता. लग्नानंतर देखील तिने आपल्यासोबत प्रेम आणि शरीरसंबंध कायम ठेवावे अशी अपेक्षा तो तिच्याकडून बाळगून होता. मात्र आता मी एक विवाहिता असून माझा पती हेच माझे सर्वस्व आहे असे तिने त्याला समजावले. मात्र तो काही केल्या ऐकतच नव्हता. ती माहेरी आली म्हणजे लपून छपून तो तिच्या सर्वांगावर अधाशाप्रमाणे तुटून पडत असे.

लग्नानंतर सासरी गेलेली राजकुमारी पतीसोबत राहू लागली. तिच्या पतीला मद्यसेवन करण्याचा नाद होता. आपल्या पतीला मद्यसेवनाचा नाद असल्याचे लग्नानंतर तिच्या लक्षात आले. मात्र आता पती हेच आपले सर्वस्व असून त्याचे वर्चस्व आपल्याला सहन करायचे असे समजून ती संसाराला लागली. दिवसामागून दिवस जात होते. बघता बघता राजकुमारीच्या संसारवेलीवर दोन फुलांचे आगमन झाले. अगोदर तिला एक कन्यारत्न आणि नंतर एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. दोन मुलांची आई झाली तरी राजकुमारीचे सळसळते तारुण्य तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिचा पती मद्याच्या आहारी गेला होता. नेहमीच मद्याच्या दुनीयेत राहणा-या पतीला राजकुमारी पार वैतागली होती. आपला पती आज नाही तर उद्या सुधारेल अशी आशा  बाळगून राजकुमारी दिवस काढत होती. मात्र तिच्या आशेची निराशा झाली होती.

जवळपास नऊ वर्ष पतीसोबत संसार केल्यानंतर राजकुमारी पतीच्या व्यसनाला पुरेपुर वैतागली. एके दिवशी तिने आपल्या दोघा मुलांना सोबत घेत आईचे घर गाठले. आता परत पतीकडे जायचे नाही असे मनाशी पक्के ठरवूनच ती सन 2021 मधे आईकडे राहण्यास जळगावला आली. दरम्यान एका गुन्ह्यात तिचा भाऊ जेलमधे गेला होता. त्यामुळे घरात केवळ ती आणी तिच्यासह तिची दोन्ही मुले रहात होती.    

जळगावला आईकडे राहण्यास आल्यानंतर तिच्या जीवनात आता आकाश सखाराम सोनवणे या तरुणाची एंट्री झाली. आकाश सोनवणे हा दुध फेडरेशनमधे रोजंदारीने कामाला जात होता. तो विवाहीत असला तरी राजकुमारीच्या प्रेमात पडला. आपल्या जीवनाचा भुतकाळ आणि वर्तमानकाळ तिने आकाशला कथन केला. बघता बघता आकाशने तिला भावनिक सहारा देण्यास सुरुवात केली. भुतकाळ विसरुन आता तुझा वर्तमानकाळ मला दे अशी मागणी आकाशने राजकुमारीकडे केली. दोन मुलांची आई असलेली राजकुमारी अवघी पंचविशीत होती. तारुण्याचा उन्माद अजूनही तिच्यावर स्वार होता. विवाहीत आकाशचा स्पर्श होताच तिचा रोम रोम आणि शरीरातील हार्मोन्स सळसळ करु लागले. तिच्या कानाजवळ जाऊन त्याने हळूच तिला “आय लव्ह यू” असे म्हणताच तिच्या मनाच्या नगरीत खळबळ माजली. तिच्या मनातील प्रेमाच्या समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आली. आकाशकडून शरीर सुखाची आस तिला हवीहवीशी वाटू लागली. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा होकार देताच तिच्या मनात शरीर सुखाची एक जोरदार लाट आली. त्या लाटेवर स्वार होत दोघांनी एकमेकांसोबत शैय्यासोबत सुरु केली. काही महिन्यापुर्वी दोघांनी यावल तालुक्यातील एका मंदीरावर गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जाते.

शिवशक्ती नगरात राहणा-या राजकुमारीच्या आईने आता घर बदलले. ती आणि तीची आई असे शिवाजीनगर हुडको भागात राहण्यास आले. दोघा महिलांना अडीअ‍डचणीत सहारा देण्यासाठी आकाश त्यांच्याकडेच राहू लागला. आपली अगोदरची प्रेयसी पतीला सोडून आईकडे माहेरी राहण्यास आली असल्याचे नरेशला समजले. त्यामुळे त्याने तिच्या नवीन घराचा पत्ता शोधून काढला. तिला भेटण्यासाठी नरेश तिच्याकडे येऊ लागला. तिने पुर्वीप्रमाणेच आजही आपल्यासोबत प्रेम आणि शरीरसंबंध ठेवावे अशी अपेक्षा नरेश बाळगून होता. मात्र राजकुमारीच्या जीवनात आता आकाश आला होता. त्यामुळे पुर्वीचा नरेश आता तिच्या प्रतिक्षा यादीतून बाद झाला होता. तु यापुढे मला भेटण्यासाठी येऊ नको असे तिने नरेशला बजावले. तरीदेखील राजकुमारी आपल्यासोबत पुर्वीप्रमाणेच संबंध ठेवेल आणि तसेच सुख देईन अशी खुळी आशा तो बाळगून होता. मात्र राजकुमारी त्याच्या ताकास तुर लागू देत नव्हती. तिला आता आकाश जवळचा वाटत होता.

प्रत्येकवेळी तिने त्याला अक्षरश: हाकलून दिले. मात्र तरीदेखील ती घरात एकटी आहे का? अशी माहिती काढून तो तिला भेटण्यासाठी वेटींग लिस्टवर अधाशासारखा येतच होता. मात्र त्याच्यासाठी तिचे डोअर लॉक झाले होते. तरी देखील तो तिच्या दरवाजावर टकटक करतच होता. ती कधीतरी आपल्यासाठी तिच्या घराचा आणि मनाचा दरवाजा किलकिला करेन अशी आशा तो मनाशी बाळगून होता. तो तिच्यासाठी दिवाना झाला होता. त्याला ती हवी होती. तिच्या स्पर्शासाठी तो चटावला होता. त्याला पुर्वीसारखे ते दिवस हवे होते. मात्र परिवर्तन हाच जगाचा नियम असतो हे समजून घेण्यास त्याचे मन तयारच होत नव्हते. ती काल आपली होती आज दुस-याची आहे याचा स्विकार करण्यास तो तयारच होत नव्हता. त्याला काहीही करुन राजकुमारी हवी होती. कधी एकदा तिच्या शरीरावर स्वार होण्याची संधी मिळते आणि आपली कामक्रिडा पुर्ण होते या संधीच्या शोधात तो रहात होता. मात्र ही संधी शोधता शोधता आपण काळाच्या कवेत जाऊ हे त्याला माहीतच नव्हते. तु आकाशसोबत लग्न का केले? तु माझ्यासोबत संबंध का ठेवत नाही असे प्रश्न विचारुन तो तिला भंडावून सोडत होता. “जल बिन मछली” – “नृत्य बिन बिजली” अशी त्याच्या तन – मनाची अवस्था झाली होती. राजकुमारीसाठी नरेश तडफडत असल्याचे तिच्या आईसह आकाशच्या लक्षात आले होते. त्यामुळे दोघेही तिला एकटी सोडत नव्हते. दोघांपैकी एक जण तिच्यासोबत कायम रहात होते. 

अखेर 26 मार्चचा तो काळा दिवस नरेशच्या जीवनात आला. तो स्वत:हून मरणाच्या दिशेने वाटचाल करत राजकुमारीच्या घराच्या दिशेने गेला. भर दुपारची उन्हाची वेळ होती. जवळपास सर्वच लोक यावेळी घरात कुलर अथवा पंखा लावून आराम करत असतात. अशा वेळी गुपचूप राजकुमारीसोबत सुख उपभोगण्याचे काही क्षण घालवण्याच्या हेतून तो तिच्या घरी आला. त्यावेळी आकाश आणि राजकुमारी सोबतच होते. दोघांचा खेळ रंगात आला होता. त्याचवेळी तिचा पुर्वीचा प्रेमी नरेशचे त्याठिकाणी आगमन झाले. आपल्याऐवजी आकाश तिच्याजवळ हजर असल्याचे बघून नरेश तिच्यावर खेकसला. आकाश तुझ्या घरात कसा काय आला, तु त्याला घरात कसे काय येऊ दिले अशी प्रश्नांची सरबत्ती करत नरेश संतापाच्या भरात राजकुमारीवर हक्क गाजवत तिला मारहाण करु लागला. आकाशला बघून नरेशचा संताप अजून अनावर झाला. अजून आक्रमक होत दाराला लावलेला दगड उचलून तो राजकुमारीवर चाल करुन आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तिने हळूवारपणा दाखवत नरेशच्या हातातील दगड हळूच काढून घेत बाजूला ठेवला. अशा प्रकारे तिने परिस्थितीवर जेमतेम नियंत्रण मिळवले. आकाशने देखील त्याला आवरते घेतल्याने नरेशला अजूनच चेव आला. पुढील टप्प्यात नरेशने त्याच्या खिशातून चाकू बाहेर काढत राजकुमारीवर हल्ला करण्यासाठी झेपावला. नरेशचा राजकुमारीवरील जीवघेणा संताप बघून आता आकाशने त्याला हात धरुन बाजुला केले.

सर्वप्रथम आकाशने राजकुमारीला घरातून सुरक्षीतपणे बाहेर काढले. त्यानंतर आकाशने घराची कडी आतून लावून घेतली. आता बंद खोलीत केवळ नरेश आणि आकाश असे दोघेच जण होते. राजकुमारी भराभर पाय-या उतरुन खाली आली. काही वेळातच आतून बनीयन व हाफ पॅंट घातलेला आकाश दार उघडून घराच्या बाहेर आला आणि कुणाशी काही न बोलता निघून गेला. त्याने नरेशच्या अंगावर सपासप चाकूहल्ला केला होता. पुढील काही क्षणातच नरेशने जीवाच्या आकांताने राजकुमारीला सर्व बळ एकवटून हाक मारली. मला दवाखान्यात घेऊन चल………. असे तो जोरात किंकाळला. नरेशची आर्त किंकाळी ऐकून गल्ल्लीतील लोक रस्त्यावर जमा झाले. काय  झाले ते बघण्यासाठी राजकुमारी पाय-या चढून घरात गेली. त्यावेळी तिचा पुर्वीचा प्रियकर नरेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घरात रक्ताचा जणूकाही सडा पडला होता.  जखमी अवस्थेत नरेश जीवन मरणाच्या दारात पडलेला होता. तो तिला पाणी मागत होता. त्याची दया आल्याने तिने त्याची मान उचलून त्याला पाणी पाजले.

जखमी अवस्थेत त्याने त्याच्या मोबाईलवरुन एका मैत्रीणीसह मित्राला फोन करुन घटना कशीबशी कथन केली. त्या मैत्रीणीने नरेशच्या एका मित्राला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर तो फोन त्याने राजकुमारीच्या हातात देत सांगितले की माझे काही मित्र येत आहेत तू खाली थांब. घाबरलेली राजकुमारी नरेशचा फोन हातात घेऊन बाहेर थांबली. तिच्या हातातील त्याच्या मोबाईलवर मित्रांचे फोन येत होते. त्यानुसार ती त्यांना कुठे व कसे यायचे ते सांगत होती.

काही वेळातच जखमी नरेशचे काही मित्र व मैत्रीण असे सर्वजण घटनास्थळी मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमी नरेशला त्याच्याच रिक्षात टाकून सरकारी दवाखान्यात नेले. दरम्यान नातेवाईकाच्या भेटीला खासगी दवाखान्यात गेलेली राजकुमारीची आई घरी परत आली. आल्यानंतर सर्व प्रकार समजल्यानंतर ती सुन्न झाली. घरातील रक्ताच्या थारोळ्यात जाण्याची कुणी हिंमत करत नव्हते. काही वेळाने या घटनेचे  वृत्त शहरात  वा-यासारखे पसरले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या घटनेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. घटनेची माहिती समजताच सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड, एलसीबीचे पथक, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार, त्यांचे सहकारी ओमप्रकाश सोनी असे सर्वच जण घटनास्थळासह सरकारी दवाखान्यात दाखल झाले. पोलिस अधिका-यांनी घटना समजून घेतली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकारी व कर्मचारी कसून तपासकामी लागले. घटना सर्वांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. फरार संशयीत आकाश सखाराम सोनवणे याचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जोमाने कामाला लागले.     

या घटनेप्रकरणी मयत नरेश आनंदा सोनवणे याचा भाऊ मुकेश आनंदा सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 76/2022 भा.द.वि. 302 नुसार सदर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. दरम्यान फरार संशयीताच्या शोधार्थ पथक रवाना  झाले होते. नरेशची हत्या करुन घटनास्थळावरुन बनियन आणि हाफ पॅंटवर निघालेला आकाश विनाविलंब घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने तात्काळ पत्नीला ओळख लपवून घराबाहेर निघण्यास सांगितले. त्याने थोडक्यात सांगितलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नीने चेह-याला दुपट्टा बांधून त्याच्यासोबत पलायन करण्याची तयारी केली. मिळेल त्या रेल्वेने जळगाव सोडून पत्नीसह पळून जाण्याची आकाशने तयारी केली. त्याने देखील आपली ओळख लपवत कपडे बदलून पळून जाण्याची तयारी चालवली.

नरेशची हत्या करुन पलायन केलेला आकाश नक्कीच रेल्वेने पळून जाणार असे गृहीत धरुन आणि तर्क वापरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, प्रितम पाटील अशा चौघांनी रेल्वे स्टेशनच्या चारही दिशेला आपला सापळा रचला. ज्या कुणाला आकाश सापडेल त्याने सर्वांना मदतीला बोलावून घ्यावे असे चौघांनी आपसात ठरवून घेतले. गुप्त बातमीदारांची देखील मदत जोडीला घेण्यात आली होती.  खब-याने माहिती देताच चौघांनी मिळून काही तासातच आकाशला  त्याच्या पत्नीसह गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेण्यात यश मिळवले.  त्याला पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार व पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी यांनी अटकेतील संशयीत आरोपी आकाश सोनवणे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान आकाशने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार व त्यांचे सहकारी पोलिस नाईक ओमप्रकाश सोनी करत आहेत. (या कथेतील राजकुमारी हे नाव  काल्पनिक आहे.)   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here