चोरीचे जेसीबी विकत घेणा-यास अटक

जळगाव : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथून चोरी करण्यात आलेले जेसीबी मशीन विकत घेणा-यास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सात लाख रुपये किमतीच्या जेसीबी चोरी प्रकरणी देवराज गजेबा सोनसाळे रा. जाफ्राबाद जिल्हा जालना यांनी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासकामी टेंभुर्णी पोलिसांचे पथक एमआयडीसी पोलिसांचे सहकार्य घेण्याकामी आले होते. नंदलाल उर्फ करण राजेंद्र मौर्या रा. ऑटो नगर अशोक नगर जळगाव याने सदर चोरीचे जेसीबी मशीन विकत घेतल्याची माहिती पो.नि.धनवडे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे राजेंद्र मौर्या यास दुरदर्शन टॉवर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासकामी नंदलाल मौर्या यास टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जेसीबी चोरण्याकामी त्याच्या साथीदाराने गुन्ह्यात वापरलेली आयशर मिनी ट्रक देखील जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. ईमरान सैय्यद, पो.ना. योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here