सिंधी कॉलनीत आगीत घर जळून भस्मसात

jain-advt

जळगाव : जळगाव येथील सिंधी कॉलनी सेवा मंडल परिसरातील घरात आज सकाळी चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीने रौद्ररुप धारण करत सर्व घरच भक्षस्थानी पडले  आहे. 

प्रत्यक्षदर्शीं तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत भस्मसात झालेल्या घरात भाडेकरी महिला रहात असून ती गेल्या  काही दिवसांपासून हरिद्वार येथे गेली आहे. भाडेकरी महिलेकडून बोरिंग मशिनचा स्विच सुरु राहून गेला होता असे म्हटले जात आहे. विज प्रवाह सुरु झाल्यानंतर पाणी भरण्याची बोरींग मशिन सुरुच राहीली. त्यामुळे शॉर्ट सर्कीट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत संपुर्ण घर भस्मसात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पाण्याचे दोन बंब दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात असली तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद झालेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here