उलटला टेम्पो सापडला गांजा

उमरगा : भरधाव वेगातील टेम्पो गतीरोधकावर आदळल्याने उलटण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा नजीक घडली. हैद्राबाद येथून सोलापूरच्या दिशेने जाणा-या या टेम्पोत अडीच किलो वजनाची 506 गांजाची पाकीटे  पोलिसांना आढळून आली. या गांजाचे बाजारमुल्य अंदाजे 1 कोटी 26 लाख 50 हजाराहून अधिक असल्याचे म्हटले जात आहे.  याप्रकरणी उमरगा पोलिस स्टेशनला गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.  शनीवारी 2 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे गांजाची चोरटी वाहतुक उघडकीस आली आहे.

वरवर भाजीपाल्याची वाहतुक वाटत असली तरी आतून गांजाची वाहतुक यानिमित्ताने उघड  झाली.  दरम्यान घटनास्थळी जमलेल्या काही गांजा शौकीनांनी पाकिटे लंपास केल्याचे म्हटले जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक समाधान कवडे, स.पो.नि. अशोक माळी, तहसीलदार राहुल पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here