अविनाश जाधवांच्या तडीपारीबाबत मनसेची आक्रमक भूमिका

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव

अ‍ॅड. जमीलजी देशपांडे यांचे परखड मत, बघा व्हिडिओ

ठाणे : मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शासनाकडून दोन वर्ष हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यांना पाच जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे. मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हे शिवशाहीचं सरकार नसून मोगलाई सुरु असल्याची प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

‘अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला कोण अडवतय ते बघूया’, असं आव्हान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिले आहे. अविनाश जाधव यांना हद्दपारीची नोटीस दिली असली तरी त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ज्या नर्सेसची कोरोनाच्या कामासाठी नेमणूक केली होती, त्यांना अचानक कामावरुन कमी केले. त्यामुळे अविनाश जाधव यांनी आंदोलन केले हा त्यांचा अपराध आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत  असून आम्ही गप्प बसणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. या बाबत जळगाव येथील मनसेचे धाडसी नेते अ‍ॅड. जमीलजी देशपांडे यांनी आपली प्रखर भुमीका मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here