केबीसी लॉटरीच्या नावाने फसवणूक फंडा!—- अशिक्षितांचा शिक्षकाला 29 लाखांचा गंडा!!

बीड : कौन बनेगा करोडपती या नावाचा वापर करुन लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत शिक्षकाची 29 लाख 23 हजार रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या चौघा अशिक्षितांच्या टोळीला बीड सायबर सेलने अटक केली आहे. सुशिक्षित शिक्षक मोहाच्या जाळ्यात अडकल्याने गंडवला गेल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. एकंदरीत मोहाच्या जाळ्यात शिक्षीत लोक देखील फसत असल्याचे अनेक उदाहरणावरुन दिसून आले आहे.  बिहार राज्यातील पाटणा येथून चौघांना अटक करण्यात आली आहे. साहिल रंजन भिक्षुककुमार (21), रा. पूर्व इंदिरानगर, रोड क्र. 4 कंकरबाग सम्पत चक, लोहियानगर, पाटणा, संतोषकुमार सिद्धेश्वरकुमार शर्मा (21), रा. पी. सी. 548 विद्यापुरी कंकरबाग सम्पत चक, पाटणा, अमरनाथ राजकुमार (21), रा. पूर्व इंदिरानगर, लोहियानगर, रोड क्र. ४, कंकरबाग सम्पत चक, पाटणा व अतुलकुमार गौतमकुमार सिन्हा (20), रा. आंबेडकर चौक, हनुमाननगर, कंकरबाग, पाटणा अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. मोहंमद फहिमोद्दीन अब्दुल रहीम असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षक मोहम्मद फहिमोद्दीन यांनी बीड शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मोठमोठी स्वप्न दाखवून भामट्यांनी मोहम्मद फहिमोद्दीन या शिक्षकाकडून 29 लाख 23 हजार रुपये उकळले. पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पो. नि. रवींद्र गायकवाड यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव, हवालदार भारत जायभाये, पो. ना. आसेफ शेख, अनिल डोंगरे, विजय घोडके, अन्वर शेख, बप्पासाहेब दराडे, पंचम वडमारे, संतोष म्हेत्रे, प्रदीप वायभट, शुभांगी खरात यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला. अटकेतील चौघांकडून हार्ड डिस्क, वायफाय मोडेम, पाच मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. यामागील मुख्य सुत्रधार मात्र मोकाट आहे. न्यायालयाने चौघांना आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here