प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना विषबाधा

धुळे : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणा-या सुमारे सत्तर जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. विषबाधीत प्रशिक्षणार्थी पोलिसांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून काहींवर उपचार सुरु असल्याचे समजते.

उपचारार्थ दाखल प्रशिक्षणार्थी पोलिसांना सुरुवातीला चक्कर व अशक्तपणा जाणवत होता. अपघात विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यातील तिघांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत होता. इतरांना उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here