भरधाव आयशर वस्तीत शिरल्याने एक ठार

jain-advt

जळगाव : भुसावळ शहरातून यावलच्या दिशेने जाणा-या रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात भरधाव आयशर वाहन अचानक शिरण्याची घटना आज सकाळी घडली. या अपघाती घटनेत एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. मयत आणि जखमी हे दोघे भाऊ आहेत. सम्राट उर्फ गोलू दादाराव इंगळे(22) असे ठार झालेल्या घरातील कर्त्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला असून बचावला आहे.

या थरारक घटनेच्या वेळी संतप्त जमावाने आयशर चालकास पब्लिक मार दिला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जमावाची समजूत घातली. मात्र दोषी चालकावर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here