विद्युत पंप चोरणारी टोळी अटकेत

तुळजापूर :  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात विद्युत पंप चोरी करणा-या टोळीला तामलवाडी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील टोळीकडून चार अश्वशक्ती पंपासह एचटीपी पंप, औषध फवारणी पंप असा एकुण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

स.पो.नि.सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप – निरीक्षक रमेश घुले यांच्यासह अकाश सुरणर, गोरोबा गाढवे, पोलिस नाईक राठोड, मुख्य हवालदार संजय जट्टे, शेख, नरवडे, सगर, चौगुले व शिवाजी सिरसाठ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here