जळगावात दगडाने ठेचून एकाची हत्या

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावानजीक दगडाने ठेचून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मयत कोण आणि त्याची हत्या कशासाठी झाली हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. दरम्यान दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.

मयत व्यक्तीचे वय साधारण पन्नास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि गुन्हे शोध पथक कर्मचारी दाखल झाले. या घटनेतील मयताची ओळख पटवण्याचे कामकाज सुरु आहे. मयताची ओळख पटल्यानंतर खूनाचा उलगडा शक्य होणार आहे. यापुर्वी शहरात गेल्या महिन्याभरात खूनाच्या तिन घटना घडल्या आहेत. या तिघा हत्येचा तपास पोलिसांनी शिताफीने लावला असून संशयीत आरोपींना देखील अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांचे वाकबगार गुन्हे शोध पथक लवकरच या गुन्ह्याचा शोध लावतील असे जनतेत म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here