लाखो रुपयांचे मद्य पोलिसांनी केले नष्ट 

jain-advt

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशाने मौल्यवान वस्तू, वाहने मूळ मालकांना परत देण्यात येत असून अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जात आहे. विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सुमारे साडे नऊ लाख रुपये किमतीचे मद्य तोफखाना पोलिसांनी नष्ट केले आहे. दारू नष्ट केल्यानंतर रिकाम्या बाटल्यांची विक्री करुन आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एम. एम. राख, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार राठोड, शैलेश गोमसाळे, शिरीष तरटे, राऊत यांच्या उपस्थितीत हा मद्यसाठा नष्ट करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here