पिडीत कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी भाजपचा महिला सन्मान मुक मोर्चा

धरणगाव (धर्मराज मोरे) : काही दिवसांपूर्वी धरणगाव येथील भाटीया परिवार जळगाव येथे गेला असतांना त्यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी हल्ला चढवला होता. या बेदम मारहाणीचा व्हिडीओ देखील प्रसारीत करण्यात आला होता. मारहाणीच्या या घटेनेमुळे भाटीया परिवारातील सर्व सदस्य भितीपोटी गाव सोडून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान गावातील काही समाजसेवकांनी त्यांना धीर देत संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगिताले. सोशल मिडीयावर शिवसेनेच्या विरोधात पोस्ट टाकल्याचा या परिवारावर आरोप करण्यात आला होता.  

भारतीय जनता पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजयभाऊ महाजन व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांना सोबत घेत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिस प्रशासनाने मुळ फिर्यादीनुसार गुन्हा नोंद केला नसून पीडित गौरी दुतीया यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनीं नको त्या ठिकाणी हात लावत धक्काबुक्कीसह विनयभंग केला आहे. तशा स्वरुपाचा गुन्हा मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध दाखल झालेला नाही. याउलट भाटीया परिवारावरच मंगळसूत्र तोडल्याचा तसेच मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा खोटा गुन्हा नोंद करण्यात आला. महिलेचा विनयभंग होऊन देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणगाव शहरात महिला सन्मान मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मुक मोर्चा बालाजी महाराज मंदिरा पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत काढण्यात आला होता. मारहाण करणाऱ्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मंगळसुत्र व सोन्याची चेन तोडून हिसकावून घेतल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा. भाटीया परिवारावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन स्थानिक पोलिस प्रशासनाला देण्यात आले. महिला सन्मान मुक मोर्चाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक गटनेते कैलास माळी सरांनी केले. नगरसेवक ललित येवले, रिपाईच्या जिल्हाउपाध्यक्ष दीक्षा गायकवाड,गौरी दुतीया,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी,जि.प.सदस्या माधुरीताई अत्तरदे,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व धरणगाव शहरातील नागरिक बंधू भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here