युवासेनेतर्फे रामनवमी उत्साहात

जळगाव : विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवासेनेतर्फे रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. युवासेना जळगाव महानगरतर्फे जळगावच्या काव्यरत्नवली चौकात श्री राम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी साडेदहा वाजता काव्यरत्नवली चौकात प्रभू श्रीराम यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. या वेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवतीसेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, जितेंद्र बारी, शंतनू नारखेडे, अंकित कासार, आयुष्य कस्तुरे, प्रीतम शिंदे, अजय खैरनार, रोहित भामरे आदी युवासैनिक उपस्थित होते. राम रक्षा स्तोत्र पठण, राम जन्मउत्सव, आदी कार्यक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिला मिळाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here