सुमित पाटील यांना खान्देश प्रेरणा पुरस्कार

जळगाव : खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष तथा वावडदा ता.जळगाव येथील गौरी उद्योग समुहाचे चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने “खान्देश प्रेरणा पुरस्कार 2022” प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन, श्री.स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांनी खान्देश मराठा कुणबी समाज वधुवर ग्रुपच्या माध्यमातून हजारो विवाह जुळवले आहेत. समाजातील अनिष्ट रुढी, हुंडा पद्धत बंद होण्यासाठी ते जनजागृती करत असतात. या कार्यासाठी त्यांना खान्देश प्रेरणा पुरस्कार देण्यात आला असे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्तीबद्दल सर्व स्तरातून सुमित पाटील यांचे कौतुक होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here