केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

जळगाव दि.10 प्रतिनिधी – सर्व प्रकारच्या नेत्र विकारांवर उपचार एकाच छताखाली उपलब्ध व्हावा व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एक जागतिक दर्जाचे नेत्रालय जळगाव येथे उपलब्ध असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी कांताई नेत्रालयाची स्थापना केली. कांताई नेत्रालय येथे आज केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देऊन नेत्रालयातील सुविधा जाणून घेतले, यावेळी डॉ. अंशु ओसवाल यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. अंशु ओसवाल, अमर चौधरी, डॉ.भगत यांनी नेत्रालयातील सर्व विभाग दाखवले.

कांताई नेत्रालयामध्ये असलेल्या उत्तम दर्जाच्या सेवा सुविधा व यंत्रणा पाहून डॉ. भारती पवार यांनी आपली नेत्र तपासणी देखील करून घेतली. कांताई नेत्रालयात आतापर्यंत झालेल्या वीस हजार नेत्र शस्त्रक्रिया बद्दल ऐकून समाधान व्यक्त केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या. यावेळी त्यांचे सोबत श्री.पवार, जैन उद्योग समूहाचे विपणन प्रमुख अभय जैन व कांताई नेत्रालयाचे सर्व सहकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here