ट्रूजेट एयरवेजची जळगाव विमानतळावरील सेवा 20 एप्रिल पर्यंत स्थगित

जळगाव : जळगांव विमानतळावर ट्रूजेट एयरवेज ही खाजगी विमान कंपनी जळगांव ते मुंबई आणि जळगांव ते अहमदाबाद या हवाई मार्गावर सप्टेंबर २०१९ पासून विमानप्रवाशांना सेवा देत आहे. संबंधित विमान कंपनीने “operational reason “ या कारणामुळे काही काळासाठी विमानसेवा रद्द केली होती आणि कंपनी कडून मिळालेल्या माहितीनुसार 20 एप्रिल पर्यंत जळगांव ते मुंबई विमानसेवा स्थगित करण्यात आलेली आहे.

कंपनीतर्फे दूरध्वनीद्वारे असे कळविण्यात आले आहे की, काही दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे कंपनीचे ऑनलाईन पोर्टलवरील बुकिंग सेवा बंद करण्यात आली आहे व जळगांव विमानतळावरील बुकिंग काउंटर सेवा सुद्धा बंद आहे. काही विमानप्रवाशांनी Third Party App / Agency यांच्या माध्यमातून जळगांव ते मुंबई या हवाईमार्गाचे ट्रूजेट कंपनीच्या विमानप्रवासाचे तिकीट काढले होते व विमानतळावर आल्यावर विमानसेवा बंद असल्याचे कळाले.
या सर्व बाबींवरून असे आवाहन करण्यात येत आहे की, ट्रूजेट या खाजगी विमानसेवेने ऑनलाईन बुकिंग / काउंटर बुकिंग सेवा बंद केलेली आहे व तशा आशयाची संबंधित बातमी स्थानिक वृतपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती.

संबंधित विमानप्रवाशी हे Third Party App / Agency द्वारे तिकीट बुकिंग करीत असल्याने विमानसेवा सुरु आहे किंवा नाही याची त्यांना माहिती मिळत नाही परिणामी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व विमानप्रवाशांनी ट्रूजेट एयरवेज च्या अधिकृत संकेतस्थळावरुनच www.trujet.com किंवा जळगांव विमानतळावरील तिकीट बुकिंग काउंटर वरूनच तिकीट बुकिंग करावे व तिकीट बुकिंग करण्याआधी, खात्रीसाठी ट्रूजेट एयरवेज च्या पुढील क्रमांकावर / इमेल address वर कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा. ट्रूजेट एयरवेज- 9154030663 / इमेल – [email protected] विमानतळ प्रशासन – 0257-2274114 ( सोमवार ते शुक्रवार 10.00 am to 06.00 pm)

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here