अश्लील चाळे करणाऱ्या पुजाऱ्याला पब्लिक मार

अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावर असलेल्या धार्मिक स्थळी महिलेसोबत चाळे करणा-या पुजाऱ्याला परिसरातील नागरिकांसह भाविकांनी पकडून चोप दिल्याचे उघड झाले. या घटनेदरम्यान पुजा-याने घटनास्थळावरुन पलायन केले. काहींनी या घटनेचे चित्रीकरण करुन ते प्रसारीत केले.

नगर शहरातील औरंगाबाद मार्गवरील प्रसिद्ध धार्मिक स्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र उन्हाचा कडाका लक्षात घेत दुपारच्या वेळी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत पुजा-याने महिलेसोबत अश्लिल चाळे सुरु केले. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला काही भाविकांनी रंगेहाथ पकडून चोप देण्यास सुरुवात केली. काही दिवसांपुर्वी एका किर्तनकाराचा महिलेसोबत अश्लिल चाळ्यांचा एक व्हिडीओ प्रसारीत झाला होता. ती घटना ताजी असतांनाच नगर येथील पुजा-याचे अश्लिल चाळे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here