लग्नानंतर आठ दिवसात नवविवाहीता रफूचक्कर

गेवराई : वधूपक्षाला दोन लाख रुपये दिल्यानंतर वरपक्षाने स्वखर्चाने लग्न केल्यानंतर आठ दिवसांनी माहेरी गेलेली नववधू परत आलीच नाही. लग्नानंतर आठ दिवसांनी माहेरी गेलेल्या नववधूचा मोबाईल देखील स्विच ऑफ झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरदेवाने दिलेल्या फिर्यादीनुसार नवरीसह पाच जणांविरोधात गेवराई पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या तरुणीसोबत विवाह पार पडला ती अगोदरच विवाहीत असून दोन मुलांची आई असल्याचे सासरकडील मंडळींना समजले.

कृष्णा अशोक फरताळे असे फसवणूक झालेल्या गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील तरुणाचे नाव आहे. रेखा बाळू चौधरी असे माहेरी जाण्याचे निमीत्त करुन फरार झालेल्या अगोदरच विवाहीत व दोन मुलांची आई असलेल्या दुस-यांदा विवाहीत झालेल्या तरुणीचे नाव आहे. रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील मुलीचे स्थळ कृष्णा फरताळे याच्यासाठी आणले होते. नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चौघांनी दोन लाख रुपये घेण्याच्या अटीवर लग्नाची तयारी दाखवली. वर पक्षाकडून 60 हजार रुपये रोख व 1 लाख 40 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा फरताळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यस्थी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव ता. शेवगाव याच्यासह संतोष विश्वनाथ शिंदे, सुनीता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा. जाधववाडी, औरंगाबाद सिडको) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, औरंगाबाद, गंगापूर) या पाच जणांविरुद्ध गेवराई स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.कॉ. साजेद सिद्दिकी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here