सावकारी जाचामुळे मुद्रांक विक्रेत्याने कापली हाताची नस

jain-advt

जळगाव : अमळनेर येथील तिघा सावकारांच्या जाचाला वैतागून मुद्रांक विक्रेत्याने आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. प्रकाश हरचंद बडगुजर असे नस कापून घेतल्याने जखमी झालेल्या मुद्रांक विक्रेत्याचे नाव असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

हाताची नस कापून घेण्यापुर्वी पोलिसांसह काही मित्रांना त्याने सुसाईड नोट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवली. ती सुसाईड नोट पोलिसांना मिळाल्याने वेळीच धाव घेणा-या तिघा पोलिसांमुळे प्रकाश बडगुजर यांचा जीव वाचला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तातडीने हे.कॉ. सुनील हटकर, रामकृष्ण कुमावत, नीलेश मोरे यांनी बडगुजर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिघा सावकारांची नावे सुसाईड नोटमधे नमुद करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here