बालिकेवर अत्याचार प्रकरणी गुन्हा

जळगाव : दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील इसमाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरदेवळा येथील पिडीत बालिकेच्या आईने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सुभाष महादू महाजन असे संशयीत आरोपीचे नाव आहे.

12 एप्रिल 2022 च्या सायंकाळी साडेसहा वाजता पिडीत बालिका घरात दिसत नसल्यामुळे तिची आई तिचा शोध घेत होती. दरम्यान सुभाष महाजन याच्या घरातून बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रकार उघड झाला. संशयीत सुभाष महाजन हा त्याच्या घरात बालिकेवर अतिप्रसंग करत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. गल्लीतील लोकांनी सुभाष महाजन यास मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here