दानिशने लुटले नागपूरच्या मधुबालाचे सर्वस्व!- अटकेनंतर संपलेच त्याचे बलात्काराचे वर्चस्व!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : वयात आलेली मधुबाला मोबाईल हाताळण्यात एक्स्पर्ट अर्थात प्रविण झाली होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मधुबाला एखाद्या राजकुमारीप्रमाणे नटून थटून वावरत होती. महाराष्ट्राची उप राजधानी असलेल्या नागपूरची रहिवासी असलेली मधुबाला शिक्षण घेत होती. मोबाईलवरील इन्स्टाग्रामवर ती नेहमी सक्रीय रहात होती. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची जळगाव शहरातील दानिश मुलतानी या तरुणासोबत ओळख झाली. ती आपले फोटो दानिशसोबत शेअर करत होती. नागपूरची मधुबाला जळगावच्या दानिशसोबत नेहमीच चॅट करण्यात मग्न रहात होती. आपली मुलगी मोबाईलवर नेहमीच कुणातरी तरुणासोबत चॅट करत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले होते.

आपली मुलगी बिघडण्यापुर्वी अर्थात पाऊल वाकडे पडण्यापुर्वी तिचे लग्न लावून दिले पाहिजे असा विचार तिच्या आईने केला. तिचे वडील जीप चालक होते. भाडे वाहतुक करुन आलेल्या धनराशीतून त्यांचा चरितार्थ चालत असे. दिवसरात्र मेहनत करणारे मधुबालाचे वडील तिच्याकडे चोवीस तास लक्ष ठेवू शकत नव्हते. त्यामुळे तिच्या आई वडीलांनी तिच्यासाठी वर संशोधन सुरु केले. दरम्यान इकडे मधुबाला आणि दानिशच्या प्रेमाचा मळा इन्स्टाग्रामवर बहरला आणि फुलला होता. प्रेमाच्या बागेत दोघांच्या इश्काचा खेळ रंगात आला होता. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांवर आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली होती. त्यानंतर दोघांनी मोबाईलवर आपल्या प्रेमाचा इजहार केला होता. दानिशने मोबाईलवरच तिला प्रपोज केले. साधारण दिवाळीच्या कालावधीत दोघांचा सुरु झालेला प्रेमाचा झरा चार ते पाच महिने खळखळ वहात होता. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे दोघांचे प्रेम भलतेच उतू आले होते.

दरम्यान इकडे मधुबालाच्या पालकांनी तिच्यासाठी वर संशोधनची मोहीम हाती घेतली. तिचे लक्षण काही ठिक दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे लवकरात लवकर तिचे हात पिवळे करुन देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांनी तिच्यासाठी एक स्थळ आणले व निश्चित देखील केले. एप्रिल महिन्यात त्यांनी तिचे लग्न निश्चित केले. इकडे लग्न ठरले असतांना तिकडे ती दानिशसोबत प्रेमाच्या जाळ्यात पुरती फसली होती. आपले लग्न ठरले असल्यामुळे झाले गेले गंगेला मिळाले असे मनाशी म्हणत तिने दानिशसोबत सुरु असलेल्या प्रेमप्रकरणाला पुर्णविराम देण्याचे ठरवले. तिने त्याच्यासोबत असलेले मॅटर क्लोज करण्याबाबत त्याला सांगितले. आता माझे लग्न ठरले असून यापुढे माझ्याशी संपर्क करायचा नाही असे तिने त्याला बजावले. मात्र तिला भोगण्यासाठी दानिशने मनापासून तयारी चालवली होती. आपली मेहनत वाया जावू द्यायची नाही. तिला किमान एक ते दोन वेळा तरी भोगायचे असे त्याने मनाशी निश्चित केले होते. त्या विचाराने तो कामाला लागला.   

तिला भेटण्यासाठी फेब्रुवारी 2022 मधे त्याने नागपूर गाठले. आतापर्यंत केवळ मोबाईलवर संपर्क साधणारे दोघे प्रेमी प्रत्यक्ष भेटले. मला तुझ्याशी खासगीत काही बोलायचे आहे असे म्हणत तो तिला एका लॉजवर घेऊन गेला. कोणत्याही आयडी प्रुफविना दोघांना एका लॉजमधे चार तासांसाठी एक छोटीशी रुम मिळाली. शुक्रवारचा तो दिवस होता. “शुक्र है शुक्रवार है” असे मनाशी म्हणत दानीशने तिच्या सर्वांगावरुन हात फिरवण्यास सुरुवात केली. तिची सहमती विचारात न घेता त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. या चार तासांच्या कालावधीत त्याने तिच्यासोबत शैय्यासोबत करुन आपले अंग हलके करुन घेतले. अशा प्रकारे तिच्यासोबत केवळ चार तासांचा कार्यभाग साध्य करुन तो परत जळगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागला. ती देखील तिच्या घरी निघून आली.

आता तरी दानिश आपला पिच्छा सोडेल व आपल्या होणा-या लग्नात आडकाठी आणणार नाही असे तिला वाटत होते. मात्र तिच्या लग्नाची तारीख जवळ येत असतांना देखील मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे अशी तो तिला गळ घालू लागला. आता हे शक्य नाही, झाले गेले एखाद्या चित्रपटाची कथा समजून विसरुन जा असे तिने त्याला समजावले. मात्र तो काही तिचे ऐकून घेत नव्हता. मी तुझे लग्न मोडून टाकेन, तुझी बदनामी करेन असे बोलून तो तिला धाक दाखवू लागला. त्याचे दोघे मित्र बाबू उर्फ उमर आणि कामील तसेच त्याच्या मामाची मुलगी यांच्या माध्यमातून त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न सुरु केला. तिने आपल्यासोबत लग्न करावे असा दानिशचा एकंदरीत सुर होता. इकडे मित्र आणि मामाच्या मुलीच्या माध्यमातून गोड बोलून तिला समजावण्याचे त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र तो तिला बदनामीचा धाक दाखवून तिच्यावर दडपण देखील टाकत होता. एकंदरीत तिच्या होणा-या लग्नात आडकाठी आणली जात होती. या सर्व प्रकारामुळे ती वैतागली होती.

1 एप्रिल रोजी दानिशने त्याच्या मित्रांसह नागपूर गाठले. त्याने तिला सोबत घेत मलकापूर गाठले. मलकापूर येथे अकिलच्या नातेवाईकांकडे तिला काही दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर तो तिला घेऊन जळगावला आला. जळगाव येथे काही दिवस एका मित्राकडे तर काही दिवस दुस-या मित्राकडे तिला ठेवण्यात आले. या कालावधीत देखील त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. आता दानिशचा तिच्यातील इंटरेस्ट संपला होता. त्यामुळे त्याने तिला नागपूरला निघून जाण्यास सांगितले. एवढ्या दिवस तिच्यासोबत लग्नासाठी दडपण टाकणारा दानिश आता तिला टाळत होता. तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करुन त्याने आपला कार्यभाग साध्य करुन घेतला होता. तीची पुरती फसवणूक झाली होती.

नागपूरच्या दिशेने जाणा-या एका रेल्वेत तिला मध्यरात्री बसवून देण्यात आले. मलकापूर पर्यंत तिच्या सोबतीला दानिशचे दोघे मित्र होते. मलकापूर स्टेशन आल्यानंतर ते तिला एकटी सोडून निघून गेले. आता काय करावे हे तिला सुचत नव्हते. तिचे सर्वस्व लुटले गेले होते. 8 एप्रिल रोजी सकाळी ती एकटीच नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. काय करावे तिला काहीच कळत नव्हते. घरी कसे जायचे? आणि काय सांगायचे हा तिला प्रश्न पडला होता. दोन दिवस ती नागपूरच्या बस स्टॅंडवर वेड्यासारखी बसून राहीली. मिळेल ते खावून तिने दिवस काढले. अखेर 9 एप्रिल रोजी तिने तिच्या मावशीच्या मुलाला बोलावून घेतले. त्याच्यासोबत ती मावशीच्या घरी गेली. आपल्या घरी जाण्याची तिची हिमत झाली नाही. 

तिची कर्मकहानी ऐकून मावशीने देखील तिला आपल्यासोबत राहू देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे तिने दानिशला फोन करुन घेण्यासाठी नागपूरला बोलावले. दानिशला आता तिची गरज राहिली नव्हती. त्याचा तिच्यातील इंटरेस्ट संपला होता. तुला गरज असेल तर तु एकटी जळगावला ये मी आता येणार नाही असे त्याने तिला म्हटले. अखेर ती एकटीच 11 एप्रिल रोजी पुन्हा जळगावला आली. आल्यानंतर तिने दानिशला खुप वेळा फोन लावला. मात्र त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तिच्या पायाखालची जणू जमीन सरकली. ती हवालदिल झाली. ती पुरती फसली होती. बघता बघता आणि विचार करता करता तिला मोठ्याने रडू कोसळले. दानिशने फोन बंद करुन ठेवला होता.

जळगाव रेल्वे स्टेशनवरुन ती वाट दिसेल तिकडे पायी पायी चालू लागली. विचारांच्या गर्तेत चालत चालत ती नुतन मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या इमारतीजवळ आली.  तिला काहीच सुचत नव्हते. ती तेथेच धप्पकन बसली आणि धाय मोकलून रडू लागली. ही अनोळखी तरुणी नक्कीच कोणत्यातरी संकटात सापडली असल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी ओळखले.  काही नागरिकांनी तिच्याजवळ जावून तिची आस्थेने विचारपूस केली. तिने देखील घडला प्रकार सविस्तर कथन केला. तिला काही सामाजिक कार्यकर्त्या महिलांकडे नेण्यात आले. त्यांनी तिला जळगाव शहर पोलिस स्टेशनला आणून दानिश विरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगितले.  

पिडित मधुबाला हिस पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांनी तिची सर्व कर्मकहानी ऐकून व समजून घेतली. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला होता. वयात आलेल्या तरुणीचे पाऊल वाकडे पडले असल्याचे पो.नि. ठाकुरवाड यांनी आपल्या पारखी नजरेने अगोदरच हेरले होते. त्यांनी मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलिस निरिक्षक सुनंदा पाटील यांच्या समक्ष तिची कैफीयत नोंदवण्याची सुचना केली. तिची फिर्याद वजा जवाबानुसार दानीश खान मुबारक खान मुलतानी याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 94/22 भा.द.वि. 376, 420, 506 या कलमानुसर दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवत, बदनामीची धमकी देवुन इच्छेविरुद्ध बळजबरी शरीर संबंध निर्माण करत बलात्कार केल्याप्रकरणी दानिश मुलतानी यास अटक करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास तरुण तडफदार सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आला. पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी यांनी आपली तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवली. दानिश खान मुबारक खान मुलतानी याला तातडीने अटक करण्यात आली. अटकेतील दानिश यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे तसेच पो. नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे मधुबाला हे नाव काल्पनिक आहे)  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here