धान्य चोरणारे तिघे कोपरगाव पोलिसांच्या कोठडीत

अहमदनगर : कोपरगाव तालुक्याच्या चासनळी येथे रात्रीच्या वेळेस गोडावूनची पत्रे वाकवून त्यातील तेराशे किलो गहू आणि शंभर किलो सोयाबीन असे धान्य चोरुन नेले होते. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करण्याकामी पोलिसांना यश आले आहे.

अविनाश मच्छिंद्र कांबळे (29), संदीप बबन पवार (19) व एक सतरा वर्षाचा अल्पवयीन अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपींनी चोरुन 23 हजार 600 रुपयांचे गहू, 7 हजार 500 रुपये किंमतीचे सोयाबीन काढून दिले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे छोटा हत्ती हे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. एकुण 2 लाख 6 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे. पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. संदीप बोटे, युवराज खुळे, रामा साळुंखे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here