अट्टल घरफोड्या जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात

जळगाव : घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल गुन्हेगारास संशयास्पदरित्या फिरतांना अटक करण्यात आली आहे. रुपसिंग नजरु भिल्ल (50) रा.गर्दावाद ता कोकशी जिल्हा धार (मध्य प्रदेश) असे रात्रगस्ती दरम्यान पोलिसांच्या हाती आलेल्या अट्टल घरफोड्याचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे हे.कॉ.सलीम सुभान तडवी आणि होमगार्ड विनोद ठाकुर हे रात्रगस्तीवर होते. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बॅंकेच्या शिव कॉलनी शाखेनजीक भगीरथ कॉलनी परिसरात त्यांना रुपसिंग भिल्ल हा संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला. अंगझडतीत त्याच्या कमरेला पँटच्या आतील बाजुस एक फुट लांबीची टाँमी, एक मोठा स्क्रु ड्रायव्हर आणि एक पोपट पान्हा अशा वस्तू आढळून आल्या. घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहीत्य त्याच्या कब्जातून हस्तगत झाल्याने तो कोणता तरी घरफोडीचा गुन्हा करण्याच्या प्रयत्ना असल्याचे दोघांना दिसून आले.

त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा 122 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. गणेश पाटील करत आहेत. पो.उ.नि गणेश देशमुख, सफौ दिलीप सोनार, पोहेकाँ महेन्द्र पाटील, तुषार जावरे, पोकाँ समाधान पाटील, विकास पहुरकर, रविन्द्र साबळे, विनोद पाटील व चालक पोहेकाँ साहेबराव खैरनार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील रुपसिंग भिल्ल याच्याविरुद्ध महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात घरफोडीचे गुन्हे दाखल असुन तपासात अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here