मित्राची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेप

jain-advt

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी आरोपी मंगेश सुदाम वायवळ (27), रा. समसापूर, ता. परभणी याला जन्मठेपेसह पन्नास हजार रुपये दंडाची सजा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी सुनावली आहे. दंडाची रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरुपात मयताचे वडील तथा फिर्यादीस देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मयत अजय तिडके (22), रा. शहापूर, ता. खामगाव, जि.बुलडाणा याचे वडील शत्रुघ्न यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी एकुण नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. मयताच्या रुम पार्टनरसह डॉक्टरांचा जबाब यात महत्वाचा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here