जळगाव शहराच्या आकाशवाणी चौकातील सर्कल ठरतोय जीवघेणा

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील आकाशवाणी चौकात भलामोठा सर्कल तयार करण्यात आला आहे. या सर्कलचे कठडे तोडून एक अवजड चारचाकी वाहन त्यात शिरल्याची घटना आज घडली. सुदैवाने या घटनेत प्राणहाणी झाली नाही. या सर्कलमधील जागेला बगीच्याचे स्वरुप देण्यात आले आहे. या ठिकाणी बसण्यासाठी बाके देखील ठेवली आहेत. याठिकाणी बसून लोक आईसक्रीम देखील खातात. मात्र याठिकाणी अपघाताची शक्यता घडण्याची दाट शक्यता असल्याची ओरड कित्येकदा झाली आहे. मात्र त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्षच झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने या सर्कलला विरोध करण्यात आला होता. आज या सर्कलचे कठडे तोडून अवजड वाहनाने प्रवेश केल्यामुळे अपघाताची जणूकाही सुरुवात झाली असल्याचे म्हणावे लागेल. प्रभात कॉलनीनजीक तयार केलेल्या उड्डान पुलावरुन या सर्कलच्या दिशेने येणारी वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे देखील अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. या सर्कलनजीक पाटबंधारे विभागाने करुन ठेवलेले अतिक्रमण देखील काढण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहतुकीच्या अडचणीत मोठी भर पडलेली आहे.  

या पार्श्वभुमीवर युवासेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगावचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांचा खान्देश अद्भुत अभियंता पुरस्कारने सन्मान करण्यात आला. जीवघेणा महामार्ग उभारणी केल्या बद्दल युवासेनेनेतर्फे स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा आगळावेगळा करण्यात आला. याप्रसंगी युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, हूझेफा बागवान, गौरव राजपूत, राज पाटील, शंतनू नारखेडे आदी उपस्थित होते.

महामार्गावर उभारलेले उद्यान त्वरित बंद करून, पथदिवे लावावे, झालेल्या तांत्रिक चुका त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी युवासेनेच्या वतीने करण्यात आल्या. दोन दिवसात या सर्कलमधील उद्यान बंद करण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व  कार्यकर्त्यांना यावेळी सांगितले. केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिकारी वर्गाचा सत्कार होण्यासाठी युवासेनेतर्फे कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here