जळगांव जिल्हा 16 वर्षाच्या आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या 16 वर्षाच्या आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धे साठी जळगांव जिल्हाचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी आठ वाजता अनुभुती आंतरराष्ट्रीय स्कूल मैदानावर करण्यात आले आहे.

दिनांक 1/9/2006 रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू या निवड चाचणी साठी पात्र असतील. अशा पात्र खेळाडूंनी खालील लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी.
https://forms.gle/NFGYqqJcXev8j2b16
ऑलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनी क्रिकेट साहित्यासह व फक्त क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात मैदानावर सकाळी आठ वाजता हजर राहावे, असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here