कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत तिघांचा पक्षप्रवेश

jain-advt

जळगाव : जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिघांनी पक्ष प्रवेश केला. सेवानिवृत्त नायब तहसिलदार मनसुब राठोड, प्रसिद्ध शायर अमजद खान, प्रदीप चव्हाण आदींनी यावेळी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांची उपस्थिती होती.

पाचोरा तालुका कॉग्रेसच्या वतीने केक कापून शाल व पुष्पगुच्छासह नागरी टोपी घालून तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष इरफान मनियार, जिल्हा ओबीसी प्रदीप चौधरी, अ‍ॅड. वशिम बागवान, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, एनएसयुआयचे आशुतोष पवार, शंकर सोनवणे, ओबीसी शहर अध्यक्ष शरीफ शेख सय्यद कमरअली, मौसिन पठाण, रवी सुरवाडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here