श्रीमती कमलाबाई पाटील यांची आज अंत्ययात्रा

जळगाव (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील सरपंच श्रीमती कमलाबाई पंडीत पाटील यांचे 22 एप्रिल 2022 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 23 एप्रिल 2022 रोजी दुपारी बारा वाजता त्यांची अंत्ययात्रा माहेजी येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्ष एवढे होते. माहेजी येथील रहिवासी नरेश पाटील यांच्या त्या आई होत. कमलाबाई पाटील यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु व नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती कमलाबाई पाटील यांनी गेल्या दशकापासून माहेजी ग्रामपंचायतची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here