गैरहजर पोलिसाने संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद : गेल्या सहा दिवसांपासून ड्युटीवर हजर नसलेल्या पोलिस कर्मचा-याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. समीर संभाजी सोनवणे (36) रा. पिसादेवी पार्क औरंगाबाद असे आत्महत्या करणा-या तरुण पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला समीर सोनवणे कार्यरत होता.

घटनेच्या वेळी समीर संभाजी सोनवणे हा एकटाच घरात होता. त्याची पत्नी व दोन्ही मुली नातेवाईकाच्या लग्नात गेल्या होत्या. मंगळवारी पत्नी व मुली घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पाण्याचा जार देणारा कर्मचारी सलग दोन दिवस दार ठोठावत असतांना त्याला देखील आतून प्रतिसाद मिळत नव्हता. पत्नीच्या फोनला देखील प्रतिसाद मिळत नव्हता. या घटनेमागचे नेमके कारण पुढे आलेले नाही. सुसाईड नोट देखील आढळली नसून अधिक तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here