अनधिकृत गौणखनिज उत्खनन – 8 करोड रुपयांच्या दंडाची नोटीस

जळगाव : शासनाचा महसुल बुडवून अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याच्या आरोपाखाली तहसीलदार धरणगाव यांनी तिघांना 7 कोटी 94 लाख 84 हजार 944 रुपयांच्या दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. नितेश मंधान, राहुल हरणकर व सय्यद रईस (तिघे रा. जळगाव) अशी नोटीस बजावण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तक्रारदाराच्या तक्रारीला महसुल प्रशासनाकडून सुरुवातीला केराची टोपली दाखवण्यात आली होती. आपल्या तक्रारीला महसुल विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून तक्रारदाराने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतल्यानंतर या कारवाईला ख-या स्वरुपात वेग आला.

बांभोरी प्र.चा. शिवारातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या पायथ्याशी असलेल्या टेकडीवरील शेकडो ब्रास मुरुमचे मोठया प्रमाणात अनधिकृतपणे उत्खनन होत असल्याबाबत नरेंद्र मानसिंग पाटील रा. कढोली ता. एरंडोल यांनी महसुल विभागाकडे तक्रार केली होती. या पाहणीत अंदाजे 1100 ते 1200 ब्रास मुरुम उत्खनन केल्याचे आढळून आले. तक्रारदार नरेंद्र पाटील तसेच तलाठी बांभोरी प्र.चा. यांनी घटनास्थळी भेट देऊन केलेल्या पाहणीदरम्यान घटनास्थळावर उत्खनन सुरु होते. उत्खनन सुरु असतांना त्याठिकाणी वाहनांसह हजर असलेल्या नितेश मंधान, राहुल हरणकर व सय्यद रईस यांना मुरुम खोदकामाची रितसर परवानगी मागण्यात आली. परवानगी आणून देतो असे म्हणत तिघांनी वाहनांसह तेथून पलायन केले होते. शासनाचा महसुल बुडवून अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी तिघांना सुमारे आठ कोटी रुपयांच्या दंडात्मक आकारणीची नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व (३) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण माग चार-ब दि. 12/01/2018 मधील परिच्छेद 8, 9 आणि 9 (2) च्या तरतुदीनुसार सदर नोटीस बजावण्यात आली असून तिन दिवसात खुलासा सादर करण्यास देखील संबंधीतांना बजावण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी सतत पाठपुरावा केला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here