बनावट लग्न करणाऱ्या नवरीला अटक

गेवराई : बनावट लग्न करुन तरुणाची दोन लाखा रुपयात फसवणूक करणा-या नवरीला गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. गणेश फरताळे या गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील तरुणाचे रेखा बाळू चौधरी या तरुणीसोबत लग्न झाले होते.

लग्नासाठी गणेश फरताळे या तरुणाकडून नवरी व तिच्या साथीदारांनी दोन लाख रुपये घेतले होते. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरी रेखा औरंगाबाद येथे गेली. त्यानंतर ती परत येण्यास टाळाटाळ करु लागली. तिचे याअगोदर लग्न झाले असून ती दोन मुलांची आई असल्याचे नंतर उघड झाले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here