राज ठाकरेंना बघण्यासाठी आला व्यापारी——– चार लाखाची चेन लंपास झाली भर दुपारी

jain-advt

नगर : मनसे प्रमुख राज ठाकरे नगर मार्गे औरंगाबादला जाणार असल्याचे समजल्याने एक व्यापारी त्यांचे मुखदर्शन घेण्यासाठी भर दुपारी रणरणत्या उन्हात आणि गर्दीत गेला. मात्र राज ठाकरे यांना बघण्यासाठी गेल्याने त्या व्यापा-याच्या गळ्यातील चार लाख रुपये किमतीची साडे आठ तोळे वजन असलेली सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने हात की सफाई करत लंपास केली. प्रमोद रमेशलाल बेदमुथा (48) रा. अपुर्वा अपार्टमेंट नंदनवन कॉलनी बुरुडगाव रोड नगर असे सदर व्यापा-याचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नगर येथील बसस्थानक चौकात मनसेच्या वतीने राज ठाकरे यांचे उत्साहात स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही उत्साही नागरीक देखील या गर्दीत सहभागी झाले होते. त्यात प्रमोद बेदमुथा आणि त्यांचे मित्र श्रीधर दारुणकर हे देखील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक उभे होते. या गर्दीत चोरट्याने बेदमुथा यांच्या सोन्याच्या चेनवर पाळत ठेवत ती शिताफीने लंपास केली. राज ठाकरे यांना बघण्यासाठी जमलेल्या गर्दीचा चोरट्याने चांगलाच फायदा उचलला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक गडाख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here