तलवारींच्या तस्करी प्रकरणी दोघांना जालन्यातून अटक

धुळे : धुळे तालुक्यातील सोनगीर शिवारात 27 एप्रिल रोजी तलवारींची तस्करी करणारे वाहन ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत 89 तलवारी आणि एक खंजीर हस्तगत करण्यात जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणातील तपासात चौघांना ताब्यात घेतल्यानंतर आता नव्याने दोन जणांना गजाआड करण्यात आले आहे.

खालिद बासात व साजन पठाण अशी दोघांची नावे आहेत. तलवारींची तस्करी करण्यासाठी वाहन व रसद पुरवल्याचा या दोघांवर आरोप आहे. या कारवाईत यापुर्वी मोहंमद शरीफ मोहंमद शफी, शेख इलियास शेख लतिफ, सैय्यद नईम सैय्यद रहिम, कपिल विष्णू दाभाडे सर्व रा. चंदनजिरा, जालना या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here