सावत्र मामाने केला भाचीवर अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

औरंगाबाद : तेरा वर्षाच्या भाचीवर सावत्र मामाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस स्टेशनला गुन्हा करण्यात आला आहे. या घृणास्पद घटनेतील फरार मामाचा शोध सुरु आहे.

वडीलांसमवेत राहणा-या पिडीत बालिकेच्या वडीलांनी एकुण चार विवाह केले आहेत. त्यातील दोघा पत्नींचे निधन झाले आहे. दुस-या पत्नीपासून झालेल्या बालिकेवर अत्याचार झाला आहे. दोघा पत्नीचे निधन व तिसरी पत्नी सोडून गेल्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी चौथे लग्न केले. पिडीत बालिका घरी एकटी असल्याची संधी साधून सावत्र मामाने अत्याचार केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here