सावत्र आईचा दगडाने ठेचून खून

jain-advt

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा पोलिस स्टेशन अंतर्गत जगतपूर येथे मुलाने सावत्र आईचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली. शेती हिस्से वाटणी हे या हत्येमागचे कारण म्हटले जात आहे. शेती हिस्से वाटणीच्या कारणावरुन दोघा माय लेकांमधे गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरु होता.

मारोतराव विश्वेलाल भोसले (30) रा. पारधी बेडा, जगतपूर असे हत्या करणाऱ्या सावत्र मुलाचे आणी सुमन विश्वेलाल भोसले (43) असे हत्या झालेल्या सावत्र आईचे नाव आहे. हसन बसन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगरुळ चव्हाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयीत मुलगा फरार झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत. पुढील तपास सपोनि विशाल पोळकर व आशिष जामकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here