विहीर ढासळल्याने ढिगाऱ्याखाली आईसह मुलगा मृत्युमुखी

धुळे : विहीरीच्या सुरु असलेल्या खोदकामा दरम्यान काही भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली आई आणि मुलाचा मृत्यू झाला. सुनीता भिका पवार (39) आणि श्याम भिका पवार (10) असे मृत मायलेकांची नावे आहेत. धुळे तालुक्यातील मोरशेवडीत घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सुनिता भिका पवार ही महिला आपल्या पती व मुलासह  माहेरी मोरशेवडी या गावी आली होती. सुनिता पवार यांच्या वडीलांच्या शेतात विहीरीचे काम सुरु असतांना सुनिता पवार आपल्या पती व मुलासह काम बघण्यासाठी गेली होती. त्याचवेळी विहीरीचा भाग कोसळून त्यात मायलेक ठार झाले. भिका पवार यांना मातीच्या ढिगा-यातून बाहेर काढण्यात लोकांना यश आले. धुळे तालुका पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी  अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here