भुत काढण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

काल्पनिक छायाचित्र

jain-advt

यवतमाळ : तरुणीच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने आलेल्या एका बाबाने तिच्यासोबत जबरी अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. 28 जानेवारी रोजी यवतमाळ शहरात घडलेल्या या घटनेप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी दोघांना अदिलाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. शेख निसार शेख अशु (20) रा. खुर्शीद नगर आणि शाहरुख खान समशेर खान (26) रा. भगतसिंग नगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुख्य आरोपी शेखर अण्णा अजून फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. अटकेतील दोघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यवतमाळ शहरातील तेवीस वर्षाची तरुणी सतत चिडचिड करत होती. अदीलाबाद येथील शेखर अण्णा हा तांत्रीक भुतबाधा काढतो असे एका ओळखीच्या व्यक्तीकडून तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आले होते. 23 जानेवारी रोजी शेखर अण्णा त्याच्या दोघा साथीदारांना यवतमाळ येथे घेऊन आला. सुरुवातीचे चार ते पाच दिवस लिंबू कापून उपचार करत असल्याचे त्याने नाटक केले. त्यानंतर तरुणीला आपल्याजवळ एकटे सोडण्यासाठी त्याने तिच्या नातेवाईकांवर दडपण आणले. शेखर अण्णा याच्या बोलण्यात येत त्यांनी तरुणीला त्याच्याकडे एकटे सोडले. तरुणी एकटी असल्याचा फायदा उचलत त्याने तिच्यावर अत्याचार केले. झाला प्रकार कुणाला सांगायचा नाही अशी धमकी देखील त्याने तिला दिली. त्यानंतर शेखर अण्णा त्याच्या दोघा साथीदारांसह  अदिलाबाद येथे निघून गेला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव पथकातील अजय डोळे, प्रदीप नाईकवाडे, नीलेश घोसे, सूरज साबळे, मिलिंद दरेकर यांनी पुर्ण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here