लहान भावाने केला मोठ्या भावाची हत्या

अहमदनगर : मद्याच्या नशेत घरातील सदस्यांना मारहाण करणा-या मोठ्या भावाची लहान भावाने कु-हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या करणा-या अमोल अरुण लोखंडे या तरुणावर राहुरी पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव फुणगी येथील बनसोडे वस्ती परिसरात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेत राहुल अरुण लोखंडे हा तरुण ठार झाला.

राहुल नेहमी मद्याच्या नशेत घरातील सदस्यांना मारहाण करत असे. लहान भाऊ अमोलचा राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात हे कृत्य झाले. लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्याने तो जागीच गतप्राण झाला. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर संशयीत आरोपी अमोल अरुण लोखंडे यास ताब्यात घेत अटक केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी भेट दिली. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here