औरंगाबादला मित्राने केली मैत्रीणीची निर्घृण हत्या

jain-advt

औरंगाबाद : चौघे रुम पार्टनर कामावर गेल्यानंतर मैत्रीणीला रुमवर बोलावून तिची तिक्ष्ण हत्याराने ठेचून दोरीने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणूका देवीदास ढेपे (19) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची हत्या करणारा तिचा मित्र असलेला संशयीत आरोपी शंकर हागवणे हा फरार झाला आहे. फरार शंकर हागवणे याचे चौघे रुम पार्टनर रुमवर परत आल्यानंतर त्यांना रेणूका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला.

वाशिम जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेला शंकर हागवणे (25) हा नारेगाव परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. वसंतराव बंगाळे यांच्या नारेगाव परिसरातील राजेश नगर येथील खोलीत तो आपल्या मित्रांसह रहात होता. या कालवधीत त्याची रेणूका सोबत मैत्री झाली. घरमालक बंगाळे यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, विशाल ढुमे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के आदींनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here