कोट्यावधीच्या फसवणूकीतील आरोपीस अटक

jain-advt

जळगाव : कोट्यवधी रुपयांच्या अपहार व फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे.  राजकुमार नारायण पाटील (42) रा.कोल्हे हिल्स जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो धुळे पोलिसांना हवा होता. त्याला धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

राजकुमार पाटील याच्याविरुद्ध, देवपुर पोस्टे जि.धुळे येथे गु.र.न. 227/2021 भादवी 409,406,420, 201, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनीयम सन 1999 चे कलम 3, सह माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनीयम 2008 चे कलम 66 बी 65 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी राजकुमार नारायण पाटील हा एज्युकेशन फॉर यु या ऑनलाईन कंपनीचा मालक असुन त्याने सदरची कंपनी स्थापन करुन सदर कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत जळगाव, धुळे, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेकांची कोट्यावधी रुपयात फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध वरील जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता  

तो जळगाव शहरात आला असल्याची माहिती पो. नि. किरणकुमार बकाले यांना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.जालिंदर पळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोकाँ विनोद पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखा, धुळे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here