पत्नीच्या गळ्यावर कटरचे वार करुन पतीची आत्महत्या

नाशिक : पेपर कापण्याच्या कटरने पत्नीच्या गळ्यावर जिवघेणा हल्ल्यानंतर पतीने इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी घेत आमहत्या केल्याची घटना नाशिकच्या म्हसरुळ शिवारातील रामकृष्ण नगरात घडली. 7 जून रोजी घडलेल्या या घटनेत पत्नीची प्रकृती चिंताजनक असून मयत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या राजीव ठाकुर (45) असे दवाखान्यात दाखल पत्नीचे तर राजीव रतनसिंग ठाकुर (50) असे आत्महत्या करणा-या मयत पतीचे नाव आहे. मयत राजीव ठाकुर हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत होता व त्यातून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.    

रामकृष्णनगर येथील लक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राजीव ठाकूर व संध्या राजीव ठाकूर हे दाम्पत्य आपल्या दोघा मुलांसह रहात होते. चारित्र्याच्या संशयातून पती राजीव हा पत्नीसोबत नेहमी वाद घालून शिवीगाळ करत असल्याचे म्हटले जात आहे. 7 जूनच्या दुपारी त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात राजीव याने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केल्याने त्यांच्या गळ्याची नस कापली गेली. त्यात त्या जागीच कोसळल्यानंतर भेदरलेल्या राजीव याने तिस-या मजल्यावरुन उडी घेतल्याने ठार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here