चौघांच्या हल्ल्यात नाशिकला कंपनी व्यवस्थापक ठार

नाशिक (सिडको) : आईला कामावरुन कमी केल्याचा राग मनात ठेवत मुलाने आपल्या तिघा साथीदारांच्या मदतीने अंबड एमआयडीसीतील कंपनी व्यवस्थापकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चाकूचा वापर करण्यात आला. दरम्यान 7 जून रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार निवृत्ती आहेर (50) असे हत्या झालेल्या आहेर इंजिनिअरिंग कंपनीच्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

नंदकुमार आहेर यांच्यावर हल्ला करणा-या चौघांची नावे निष्पन्न झाली असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. इतर तिघे फरार आहेत. आपल्या आईला अपमानास्पद वागणूक देत कामावरुन काढून टाकल्याचा राग मनात ठेवत सदरची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यादरम्यान एका मारेक-याच्या मांडीवर चाकूचा वार लागल्याने तो जखमी झाला. दुचाकीने पळून जात असतांना रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागावरुन माग काढत पोलिसांनी तो दाखल झालेल्या खासगी दवाखान्यातून ताब्यात घेतले. अ‍विनाश रामचंद्र सुर्यवंशी असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे तिघे साथीदार फरार झालेआहेत. अपमनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here